कन्हान : – जुनीकामठी रोड वरील मरियम अम्मा दर्गा गाडेघाट येथे १०२ वा वार्षिक उर्स रविवार (दि.३०) ते दि.२ जुलै पर्यंत तीन दिवसीय उर्स थाटात साजरा करण्यात आला .
कन्हान पासुन पश्चिमेला ३ कि मी लांब गाडेघाट येथील हजरत मरियम अम्मा साहेबा दर्गा येथे रविवार दि.३० जुनला बाद नमाजे ईशा मिलाद सरीफ ने वार्षिक उर्सची सुरूवात करण्यात आली. मध्यरात्री बाद मजारे पाक गुसल सरीफ, सकाळी बाद फजर सलाम नजराना पेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार दि.१ जुलै ला दुपारी १२ वाजता अम्मा दर्गा पासून शाही संदल काढुन पिपरी मार्गे कन्हान येथील आम्बेडकर चौक, रेल्वे स्टेशनला पोहचताच संत बाबा ताजुद्दीन दर्गा ताजबाग नागपुरचा शाही संदल कामठी येथील बाबा अब्दुल्लाह शाह दर्गा येथे चादर चढवुन कन्हान च्या संदल मध्ये सहभागी होऊन दोन्ही संदल रेल्वे स्टेशन ते गहुहिवरा रोड गोवारी शहीद चौक, तारसा रोड चौक, आम्बेडकर चौकचे भ्रमण करित पिपरी मार्गाने अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे पोहचुन चादर चढवुन भाविकांनी महाप्रसादाचा आणि कव्वाली कार्यक्रमाचा लाभ घेतला. मंगळवार दि.२ जुलै ला सकाळी कुरान खानी, कुल शरीफ फातेहा करून वार्षिक उर्स चे समापन करण्यात आले. या उर्स मध्ये मोठ्या संख्येने परिसरातील भाविकांनी हजेरी लावुन दर्शनाचा लाभ घेतला. उर्सच्या यशस्वीते करिता सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन, ताजी तन्विरुद्दीन, ताजी मुस्तफिजुद्दीन सह भाविकांनी सहकार्य केले.
शादी का झांसा देकर दुष्कर्म का आरोप #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #LatestNews #NewsUpdate
CCTV ने खोला ऑटो चालक का राज! #Nagpur #NagpurNews #Crime #AutoDriver #CCTV...
नागपुर के स्कूल में दर्दनाक हादसा! #NagpurNews #SchoolNews #Student #NewsUpdate #Investigation
भंडारा बंद को मिला व्यापक जनसमर्थन #vidarbhanews #bhandara #newsupdate #maharashtranews
राष्ट्रपति के नाम सौंपा गया ज्ञापन #vidarbhanews #gadchiroli #vidarbha #vidarbha #newsupdate
शेगांव में कांग्रेस का बड़ा प्रदर्शन! #Shegaon #Buldhana #Congress #NEET #StudentProtest #newsupdate




