Published On : Tue, Dec 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करा; आमदार प्रवीण दटके यांची विधानसभेत मागणी

Advertisement

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत भाषणादरम्यान नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करा,अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो महाविकास आघाडी सरकारने फिरवला. त्यामुळे शहरातील नागरिक नागपूर सुधार प्रन्यासच्या भोंगळ कारभाराला पुन्हा बळी पडले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून शहरातील आरक्षित जागांवर फेरफार करण्यात आला. सरकारी जागा हडपल्या, बनावट कागदपत्रे तयार केली गेली आणि तसेच भूखंड अधिकृत करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप आमदार दटके यांनी केला.

राज्यात आता फडणवीस सरकार आले असून लवकरात लवकर नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करा, अशी मागणी दटके यांनी सभागृहात केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.