Published On : Thu, Nov 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

क्राईम ब्रांचचा सडकी सुपारीवर धाडसी छापा! ₹71.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर: नागपूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी लकडगंज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ₹71 लाख 80 हजार किंमतीची सडकी सुपारी जप्त केली आहे. ही कारवाई क्राईम ब्रांच पथकाने पोलिस निरीक्षक (पीआय) गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जुना भंडारा रोडवरील विक्रांत ट्रान्सपोर्ट गोडाऊन, स्मॉल फॅक्टरी एरिया येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान गोडाऊनमध्ये 359 पोती सडकी सुपारी असा मोठा साठा आढळला. तपासात ही सुपारी पानमसाला व खर्रा तयार करण्यासाठी वापरली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, ती मानवी आरोग्यास घातक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.

छापा मारल्यानंतर गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी जप्त मुद्देमाल आणि संबंधित आरोपींना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. लकडगंज पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या साठ्यामागील पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम गतीने सुरू आहे.

या यशस्वी कारवाईमुळे शहरातील सडकी सुपारीचा अवैध पुरवठा करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांच्या या ऑपरेशनमुळे आरोग्यविषयक गुन्ह्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

– रविकांत कांबळे

Advertisement

 

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.