Published On : Thu, Jul 8th, 2021

‘सीओसी’च्या मदतीने शहरातील पावसाळी परिस्थितीवर नियंत्रण

Advertisement

– अनेक तक्रारींचे निराकरण : पालकमंत्र्यांनी केली पाहणी

नागपूर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार गुरुवारी (८ जुलै) रोजी सकाळपासून पावसाने नागपूरात दमदार हजेरी लावली. शहराचा विविध चौकात पाणी साचलेले होते. वाहतुकीची कोंडी होत होती. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता कर्मचा-यांच्या मदतीने विविध चौकात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा केला. या कामात त्यांना नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याची मदत झाली. मनपा अधिका-यांनी श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) मधून संपूर्ण शहरावर निगा ठेवली आणि जिथे पाणी साचले होते तिथे तातडीने कर्मचा-यांना पाठवून पाणी निचरा करण्यास मदत केली. श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी)च्या मदतीने मनपाने शहरातील पावसाळी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी गुरुवारी (ता.८) दुपारी सिटी ऑपरेशन सेंटर ला भेट देवून शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, मनपाच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग व अग्निशमन विभागाचे अधिकारी सिटी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमाने नागपूरात विविध चौकात साचलेल्या पाण्याचा आढावा घेतात आणि झोन कर्मचा-यांच्या माध्यमाने पाण्याचा निचरा करण्याचे कार्य करीत आहेत.

नागपूर स्मार्ट सिटीच्या माध्ममाने शहरात ३६०० कॅमरे लावण्यात आले आहेत. या कॅमे-याचे ‘लाईव्ह फुटेज’ सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या ‘व्हीडियो वाल’ वर दिसतात. आरोग्य यंत्रणेने मेडिकल चौक, शंकरनगर चौक, इंडियन कॉफी हाऊस चौक सदर, जगनाडे चौक, पडोळे चौक व इतर ठिकाणी साचलेल्या पाण्याबाबत झोनच्या टीम ला सांगून रस्ता वाहतुकी योग्य केला.

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी मनपा आणि स्मार्ट सिटीचे या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. विपक्षचे नेते तानाजी वनवे, नागपूर स्मार्ट ‍सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, नगरसेवक सर्वश्री किशोर जिचकार, जुल्फीकार भुटटो, पुरुषोत्तम हजारे, नगरसेविका नेहा निकोसे, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार,मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, स्मार्ट सिटीचे महाप्रबंधक डॉ. शील घुले, अनूप लाहोटी, आरती चौधरी उपस्थित होते.

गुरुवारी शहरातील पारडी परिसरातील एच.बी.टाउन, एम.बी.शोरुम जवळ, सुरेंद्रगड अग्रवाल दवाखान्याजवळ, धरमपेठ झेंडा चौक खाली, बालाजीनगर मानेवाडा रोड प्रवीण किराणाजवळ, पोलिस लाईन टाकळी, आमदार निवास समोर, प्रतापनगर रिंगरोड वीरेंद्र अपार्टमेंटजवळ, वैभव अपार्टमेंट नारा रिंग रोड, स्मृती टॉकीज अशोका चौक, वनदेवीनगर झोपडपट्टी यशोधरानगर, महाल रोड, काटोल रोड पोलिस मुख्यालय जवळ, शांतीनगर विनायक देशमुख हायस्कूल जवळ, त्रिमूर्तीनगर चौक चैतन्य अपार्टमेंटतजवळ पाणी साचणे व झाड पडणे अशा तक्रारी प्राप्त होताच मनपाने तातडीने दखल घेत दोन्ही प्रकारच्या तक्रारी सोडविल्या.

या क्रमांकावर करा तक्रार
आपल्या परिसरात पाणी साचल्यास मनपाच्या आपात्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०७१२-२५६७०२९, २५६७७७७ आणि अग्निशमन विभागाच्या ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८, ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement