| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Feb 3rd, 2021

  कंत्राटदाराने शव वाहिनी फॅब्रिकेशन चे बिल काढण्यासाठी दबाव टाकून शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली धमकी

  त्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, यांचे कडे देण्यात आले निवेदन

  रामटेक -2 फेब्रुवारी ला नगरपंचायत पारशिवनी चे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता धनंजय ढोले यांना कंत्राटदाराने शव वाहिनी फॅब्रिकेशन चे बिल काढण्यासाठी दबाव टाकून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

  त्याबद्दल नगरपरिषद रामटेक च्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी निषेध करून त्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांकडे निवेदन देण्यात आले.

  निवेदन देताना पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता रोहित भोइर , प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, संगणक अभियंता विवेक कापगते, रचना सहाय्यक अनुप तुरकर, नगर अभियंता गणेश अंदुरे,महेन्द्र जमदाडे , गोवींदा तुपट, रंजित सांगोडे,राकेश खिचर , अजाब ठेंगरे आदीचीं उपस्थिती होती .

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145