Published On : Fri, May 20th, 2022

बाल व्यक्तिमत्व विकास शिबीर

Advertisement

एकता सार्वजनिक शारदोत्सव मंडळ , जय दुर्गा माता मंदिर पंच कमिटी ,व देशप्रेमी जेष्ठ नागरिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावरबांधे लेआऊट परिसरात दुर्गा मंदिर येथे वय वर्ष सहा ते बारा च्या वयोगटातील मुलामुलींकरिता चार दिवसीय बाल व्यक्तिमत्व विकास शिबीर ( Child Development Summer Camp ) चे आयोजन केले आहे. हे शिबीर शनिवार २१ मे , रविवार २२ मे आणि शनिवार २८ मे व रविवार २९ मे सायं ६:०० ते ८:०० पर्यंत असणार आहे .

शिबिरात मुलांना आनंदनाने अभ्यास करण्याच्या टेक्निक्स , मेमरी टेक्निक्स , शहर , जिल्हा , राज्य , देश याबद्दल जागरूकता , भाषण देण्याची कला , ग्रुप डिस्कशन , विविध खेळ ,व्यायाम सूर्यनमस्कार , प्राणायाम , मेडिटेशन अशा विविध गोष्टी शिकवल्या जातील .

Advertisement

शिबिराला मार्गदर्शक म्हणून राहुल खळतकर व राजाभाऊ रेवडकर असणार आहे . समारोप प्रसंगी प्रसिद्ध मोटिव्हेटर डॉ . नरेंद्र भुसारी यांचे रविवार २९ मे सायं ७:०० वाजता “मुलांना मोबाईल पासून दूर कसे करावे ” या विषयावर व्याख्यान होईल . शिबिराला जास्तीत जास्त मुलामुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मनोज लक्षणे यांनी केले आहे .

संपर्क : 7720044244/ 8007881717

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement