मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव तसेच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे सकाळी विधानभवनात आगमन झाल्यानंतर विधानपरिषद सभापती श्री. नाईक-निंबाळकर, अध्यक्ष श्री. बागडे व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस दलाने राज्यपाल श्री.राव यांना मानवंदना दिली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानपरिषद सभापती व अध्यक्ष यांना त्यांच्या दालनात जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement