Published On : Thu, Jul 23rd, 2015

बुलढाणा : प्लॉटवर अतिक्रमण : दोन महिलांसह सहा जणांवर गुन्हे

Advertisement


Atikraman news
खामगांव (बुलढाणा)।
येथील शर्मा हॉस्पीटल समोरील मोकळ्या प्लॉटवर बांबु व बल्या गाडून अतिक्रमण केल्याप्रकरणी प्लॉटधारकाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी डॉन महिलांसह सहा जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अकोला येथील व्यवसायिक अजयकुमार शाहीमोहन तापड़िया (57) यांच्या मलकीच्या उपरोक्त ठिकाणी प्लाट असून त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उषाबाई दिलीप सिरसाठ, दिगाबाई हेलोडे व इतर चौघांनी बांबु-बल्या वतात्या गाडून अतिक्रमण केले आहे. याबाबत प्लॉटमालक तापडीया यांनी अतिक्रमण कारणाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी तापडीया यानां शिवीगाळ करून हात-पाय तोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तापडीया यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी उपरोक्त दोन महिलांसह सहा जणां विरुद्ध कलम 448, 427, 504, 506, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका अनिल किटे हे करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement