Advertisement
कामठी:-नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकासकामाना प्रभावित होऊन कामठी तालुक्यातील वारेगाव रहिवासी व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या तरुणांनी भाजप ओबीसी महासंघाचे केंद्रिय कार्याध्यक्ष संदीप पोहेकर यांच्या नेतृत्वात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश करून घेतला दरम्यान पक्ष संघटन बळकटीसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही सुद्धा दिली.
पक्ष प्रवेश करणाऱ्यार विशेषतः संभाजी खडसे, स्वप्नील खडसे, सागर अवझें, अक्षय खडसे, सौरभ अवझे,संदीप खडसे, सुरेश खडसे, देवमन खडसे, सतीश खडसे,किसन मारबते, कवडू मारबते, सुनील मेश्राम, नाना फुणडे, अभिलाष सहारे, आदींचा समावेश होता.