Published On : Mon, Aug 2nd, 2021

विकास कामाचे भूमिपूजन

Advertisement

– आमदार राजू पारवे यांचा दौरा

बेला:- अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम ,अंगणवाडी इमारत, नाली बांधकाम व रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते नुकतेच बेला भागात करण्यात आले. यावेळी जि.प .सदस्य वंदना बालपांडे, पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, गावोगावचे सरपंच ,उपसरपंच ,अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, सदस्य, कंत्राटदार व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

दलित वस्ती सुधार योजना, जनसुविधा नागरी सुविधा जिल्हा वार्षिक निधी व क्र.3054 चे योजनेअंतर्गत विविध सिमेंट रस्ते नाली बांधकाम अंगणवाडी क्र.4 ची इमारत, जैतापूर बेला जोड रस्त्यामधील शिल्लक सिमेंट रस्ते दोन टप्प्यात, जैतापूर बेला कवलापूर इतर जिल्हा मार्गाचे डांबरीकरण इत्यादी कामासाठी अंदाजे करोडो रुपय खर्च करण्यात येणार असून त्याच्या निविदा मंजूर झाल्या आहे व कार्यादेश सुद्धा जारी झाले आहे. अशी माहिती यावेळी आमदार यांनी दिली.

बेला गावालगतच्या पांडे लेआउट मध्ये रस्त्या अभावी पायी चालणे मुश्कील झाले आहे. ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना सदर समस्या ज्ञात असतानाही अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. आमदार पा र वे यांनी येथील सिमेंट रस्ते व नाली बांधकाम या कडे लक्ष द्यावे .अशी माझी विनंती आहे.