नागपूर : महायुती सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली. या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार आहे. राखी पौर्णिमेच्यापूर्वी या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला.
आत्तापर्यंत तीन हप्ते DBT च्या माध्यमातून खात्यात जमा झाले आहेत.लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2024 होती. ती वाढवून 15 ऑक्टोबर 2024 करण्यात आली. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला. अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपयांचा बोनस जमा होणार आहे. त्याचबरोबर काही निवडक महिला आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. यामुळे पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात आला आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होईल.
मात्र काही निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात दिव्यांग महिला,एकल माता,बेरोजगार महिला,दारिद्ररेषेखालील महिला,आदिवासी भागातील महिलांचा समावेश आहे.