Published On : Tue, Nov 21st, 2017

संघाच्या गणवेशाषाची राख गंगा नदीत स्वाहाः


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात वाराणसीत येथील अहिल्याबाई घाट येथे घेण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात येथील नागरिकांनी गंगानदीत स्वच्छते बाबत सांघितले की गेल्या तीन वर्षात गंगा नदीसाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचे नियोजन गंगा साफ करण्याकरीता केले नाही आता पर्यंत अर्थ संकल्पात करोड़ो रूपयाची तरतूद केली जाते पण गंगा काही साफ झाली नाही.येथील सर्वच घाटावर घाण,अस्वच्छता पसरलेली आहे. तसेच संपूर्ण वाराणसी शहर पण अस्वच्छ आहे.स्वच्छ भारत अभियानाचा नारा देणारे स्वताच्या मतदार संघात अस्वच्छता आहे.

वाराणसी प्रधानमंत्र्याचा मतदार संघ असून अजुन पर्यंत विकासाच्या नावावर भूलथापा देण्यात येतात.गंगा स्वच्छतेचा विषय निघाला असता बंटी शेळके यांनी वाराणसी वासीयांना सांगीतले की आता है गंगा स्वच्छता मंत्रालय नागपूर चे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कड़े आहे.त्यांच्या नेतृत्वात आमच्या शहरातील महानगरपालिकेत गेल्या ११ वर्षापासून सत्ता आहे. तेथे प्रसिद्ध नागनदी आहे. ती १७ किलोमीटरची नागनदी अजुन पर्यंत साफ केली नाही नाहीतर विशाल गंगा नदीचे स्वछेतीकरण सोडून दया बंटी शेळके यांनी आपल्या नागपूर ते वाराणसी जनचेतना बाईक रैलीचे प्रयोजन सांघितले की प्रधान मंत्र्याना जागे करण्यासाठी जे आपल्या शहरातील गंगा नदी स्वच्छ करण्याकड़े दुर्लक्ष करतात ते काय गंगा नदी साफ करणार? दुसरे म्हणजे आमचे उपाध्याय राहुल गांधी यांचा विनाकरण भाजप व RSS कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालया समोर पुतळा जाळला.आम्ही युवक काँग्रेसनी हे सहन केले नाही त्यांना जसाचे तसे उत्तर दिले. आम्ही संघाचा गणवेश असणारे खाकी चड्ढी व काळी टोपी त्यांच्याच गढात घुसुन संघ मुख्यालयात जाळली. त्याची राख घेऊन नागपूरहुन जनचेतना बाईक रैली द्वारा वाराणसीत आलो आज आम्ही ती राख गंगा नदीत विसर्जित केली.

हा अनोखा उपक्रम पाहुन वाराणसीतील काँग्रेस नेते व जनता यांनी कल्पक बुद्धिची दाद दिली व यावेळी संघ से आज़ाद भारत अश्या घोषणा देण्यात आल्या या पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश विघाटक कृत्य आमच्या कांग्रेस नेत्यांच्या विरोधात काही बोले तर जागो जागी संघाचा गणवेश जालन्यात येईल असा इशारा बंटी शेळके यांनी दिला आजच्या विशाल कार्यक्रमात आमदार अजय राय, प्रदेश महामंत्री सतीश चौबे, युवक कांग्रसचे राघवेंद्र यादव, शालिनी यादव, प्रीती यादव,प्रजनाथ शर्मा, ब्रिजेश पांडे, ओमप्रकाश ओझा, विजयशंकर पांडे, मयंक यादव, इत्यादि वाराणसीतील कांग्रेस नेते उपस्तिथ होते.

या प्रसंगी नागपुर लोकसभा युवक काँग्रेस महासचिव आलोक कोंडापुरवार,राजेंद्र ठाकरे, स्वप्निल बावनकर, अखिलेश राजन, स्वप्निल ढोके, हेमंत कातुरे, अक्षय घाटोळे, निखिल बालकोटे, ओमदीप झाडे, फरदीन खान, नखिल अहमद, आशीष लोनारकर, राज बोकडे, पूजक मदने, अतुल मेश्राम, निखिल गौरकर, विक्की गौर, प्रफुल राज वैद्य, वरुण पुरोहित, सौरभ वानखेड़े, नीलेश सावरकर, हर्षल बहादुले, विक्की नटिये, आलोक जोशी, रामचंद्र नांदने, सौरभ शेळके, इशांत शनगनवार, धीरज शेंन्द्रे, आनंद महाजन, विजय हाथबूडे, दिवाकर पलांदुरकर व असंख्य सहभागी झालेले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.