Published On : Fri, Mar 27th, 2020

ऊर्जा मंत्री यांच्या कडून महावितरणच्या कामाची प्रशंसा

Advertisement

कोरोना आणि वादळ वाऱ्यात वीज ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाचे योगदान उल्लेखनीय

नागपूर: कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे बंद असताना आणि मागील दोन दिवस अवेळी झालेल्या वादळ वारा ,पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या वतीने तत्परतेने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे.कोरोना विषाणूंमुळे संसर्ग होऊ नये, म्हणून सर्व जनता घरी आहे. अशावेळी,जनतेला अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणचे अधिकारी-अभियंते-तंत्रज्ञ-कामगार प्रतिकूल परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात व्यस्त आहेत ,आपली सेवा चोखपणे बजावत आहेत.

शुक्रवारी ,सदर येथील मंगळवारी बाजार परिसरात महावितरणचे जनमित्र वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करीत असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना समजताच त्यांनी ह्या कामाची माहिती घेतली व व्यस्त दिनचर्येतून वीज अधिकारी-कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविण्याकरिता त्यांचे कौतुक करण्याकरिता ते थेट कार्यस्थळी पोहचले.

Advertisement

कोराना विषाणूच्या पार्शवभूमीवर ,सध्यस्थितीत आपली जबाबदारी वाढली आहे,जनतेला अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ऊर्जा विभागातील प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व ही देशसेवा समजून आपली सेवा दिली पाहिजे. काम सुरू करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन घ्या, आवश्यक असेल त्यावेळी तोंडावर मास्क लावून काम करा,असा पालकत्वाचा सल्ला त्यांनी उपस्थित जनमित्रांना दिला.यावेळी नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे,अतीरिक्त कार्यकारी अभियंता गुरुदेव सोरटे, जनमित्र सतीश पराडकर,समीर पढाण,सचिन शेवारे,विशाल रोकडे,राधेश्याम पटले उपस्थित होते.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges