Published On : Fri, Mar 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच अभिनेता गोविंदाला पक्षात घेतले;अनिल देशमुख यांचे टीकास्त्र

Advertisement

नागपूर :लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अद्यापही आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले नाही. यातच अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेसाठी हे दुर्दैवी असल्याचे म्हटले.गोविंदा हे काँग्रेसचे खासदार होते हे सगळ्यांनाच माहीत आहे.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच त्यांच्या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र, निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, म्हणून ते सिनेसृष्टीतील लोकांना आणून तिकीट देत आहेत, हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दुर्दैव आहे, अशा शब्दात गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी टीका केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.