Published On : Fri, Jul 23rd, 2021

शुक्रवारी ७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २३ जुलै ) रोजी ७ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ४०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.