Published On : Fri, Jun 18th, 2021

गुरुवारी १० प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १७ जून) रोजी १० दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ५७,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.