Published On : Wed, Jun 12th, 2019

युवक कांग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष सचिन भोयर भाजप च्या वाटेवर

Advertisement

कामठी: नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा सर्वाना आश्चर्यकारक असला तरी भाजप ला मिळालेली एकहाती सत्ता ने कांग्रेस तोंडघशी पडली आहे तर कामठी रामटेक लोकसभा निवडणुकीत कांग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांचा पराभूत होऊन भाजप-शिवसेना समर्थीत उमेदवार कृपाल तुमाणे निवडून आल्याने निवडणुकीची मुख्य धुरा सांभाळणारे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय वजन अधिकच वाढले त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीची रणनीती लक्षात घेता उद्याचे भवितव्य व राजकीय प्रगती च्या उद्देशातून पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना राजनीती क्षेत्रातील चाणक्य बुद्धी विकासपुरुष म्हणून यांच्या विकासकामांना प्रभावित होऊन कांग्रेस चे कित्येक दिग्गज भाजप च्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे तर भाजप च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर युवक कांग्रेस चे माजी कामठी तालुका अध्यक्ष व येरखेडा ग्रा प महिला सदस्य पती सचिन भोयर यासह इतर चार कांग्रेस पदाधिकारि व कांग्रेसप्रणित निवडून आलेले ग्रा प सदस्य भाजप च्या वाटेवर असून येत्या 14 जून ला येरखेडा ग्रा प परिसरात होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमात भाजप च्या वाटेवर असलेले सचिन भोयर सह इतर कांग्रेस सदस्य भाजप मध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची विश्वसनोय माहिती आहे.

नागपूर जिल्ह्याची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून येरखेडा ग्रामपंचायत ची ओळख आहे या ग्रा प मध्ये 17 सदस्य असून कांग्रेस ची सत्ता आहे यातील 12 सदस्य हे कांग्रेस तर 5 भाजप चे सदस्य आहेत तसेच येरखेडा हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदन शिल क्षेत्र असून या परिसरात नागपूर जिल्हा परोषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर तसेच जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी यांचा गढ मानला जातो या दोघांचा या परिसरात दांडगा प्रभाव असल्याचे बोलले जाते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लागलेला एकहाती निकाल व विकासपुरुष म्हणून प्रसिद्ध पावलेले पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रभावित होऊन कांग्रेस चे कित्येक पदाधिकारो भाजप च्या वाटेवर असल्याने कांग्रेस ला चांगलीच खिंडार पडणार असून अश्या बिकट परिस्थितीत कांग्रेस ला मजबूत व बळकट करण्यापेक्षा कांग्रेस संपण्याच्या मार्गावर असल्याने कामठी -विधानसभा क्षेत्रात कांग्रेस चे वाजताहेत तीनतेरा अशी स्थिती निर्माण होत आहे.तर कांग्रेस चे बहुतांश भाजप च्या वाटेवर असून लवकरच राजकीय गौप्यस्फोट होणार असल्याचा विश्वास भाजप चे वरिष्ठ पदाधिकारी यांनी प्रतिनिधींशो बोलताना व्यक्त केला

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement