Advertisement
नागपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, रेल्वेतून पसार झाला. ही घटना बोदवड रेल्वे स्टेशन येथे घडली आहे. सतीश उर्फ छोट्य जैमुख काळे रा.तळोजा असे फरार आरोपीचे नाव आहे.
सतीशला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.नाशिक येथे सुरू असलेल्या केसच्या सुनावणी करिता , न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नागपूर पोलिसांचे पथक २६नोव्हेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने घेऊन जात होते.वाटेत २७नोव्हेंबर रोजी पहाटे २.३०वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्टेशनवर त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला.त्याचा शोध घेण्यात येत असून तो अद्यापही मिळाला नाही.
Advertisement