Published On : Wed, Jul 11th, 2018

नागपूर मेट्रोच्या पहिल्या एलिव्हेटे सेक्शनवर`बुलंद’चे प्रदर्शन

नागपूर : शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नावारुपास आलेल्या महामेट्रोचे विकास कार्य अधिक गतीने सुरु आहे.एलिव्हेटेड सेक्शनवर एअरपोर्ट साउथ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत १.५ किमी ट्रॅकचे कार्य जवळपास पुर्ण झाले असून या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी या ट्रॅकवरुन बुलंद शटर इंजिन ने औपचारिक प्रदर्शन करण्यात आले. यासंदर्र्भात आयोजित पाहणी दौरादरम्यान या भागात किती कार्य पुर्ण झाली यासंदर्भात माहीती महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.

महा मेट्रो च्या एकूण प्रकल्पात एलिव्हेटेड सेक्शन मधील हा पहिलाच प्रयोग असून एअरपोर्ट साउथ ते एअरपोर्ट दरम्यान हा एलिव्हेटेड सेक्शन आहे. यात वायाडक्टची उंची सुमारे ८ मीटर असून एअरपोर्ट साउथ ते सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशनपर्यंत रिच- १चा एलिव्हेटेड सेक्शन असणार आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एअर पोर्ट स्टेशन येथे रुळ टाकण्याचे कार्य वेगाने सुरु असून सुमारे ६ किमी पर्यंत रुळ टाकण्यात आले आहे. दोन रूळामधील अंतर १४३५ मिली मिटर आहे. यावेळी रिच-१ चे कार्यकारी संचालक देवेंद्र एम. रामटेककर, मुख्य निवासी अभियंता ए. बी. गुप्ता, रहिवासी अभियंता ए. पी. शर्मा, सुशिल कुमार, व इतर अधिकारी उपस्थित होते.

एअरपोर्ट व जयप्रकाश नगरातील मेट्रो स्टेशनचे विकास कार्य अंतिम टप्प्यात असून अवघ्या काही दिवसात या स्टेशनवर अद्ययावत तंत्रज्ञान प्रणाली असलेले कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. येथील मेट्रो स्टेशनचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट समोर सुमारे ५०० मीटर अंतरावर वर्धा महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या पिलरवर हे आधुनिक स्टेशन उभारण्यात येणार आहे. २२३० वर्गमीटर इतक्या जागेवर एकूण २२ हे पिलरवर स्टेशन उभारण्यात येत आहे. स्टेशनची लांबी ८० मीटर व रुंदी २६ मीटर आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठराविक अंतरावर मोठे पाईप बसविण्यात आले आहे.

जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनचे ६० टक्क्याहून अधिक कार्य आतापर्यंत पूर्ण झाले आहे.यात स्टेशन ऑपरेटिंग रुम, जीपीएस तंत्रज्ञान, टेलिकॉम आणि सिग्नल देणारे तंत्रज्ञान सुविधा येथे असणार आहे. आधुनिक शैलीवर या स्टेशनचे बांधकाम होत आहे. २४०० वर्गमीटर जागेवर हे स्टेशन तयार करण्यात येत आहे. स्टेशनची उंची २५ मीटर असून ३ कॉनकोर्स तयार करून ४ थ्या माळ्यावर प्लॅटफार्म असणार आहे.

Advertisement
Advertisement