नागपूर : आज लाईट ऑफ होप फाउंडेशनच्या वतीने जापनीज गार्डन,सेमिनरी हिल्स, नागपूर येथे आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या तर्फे तमाम भारतवासीयांना देण्यात आलेल्या फिटनेस चॅलेंजचा स्वीकार करण्यात आला व संस्थेच्या सर्व सदस्यांनी गार्डन मधील ग्रीन जिम वापर करून व्यायाम केले व निरंतर व्यायाम करण्याची शप्पत सर्व सदस्यांनी घेतली.
तसेच तिथे उपस्थित नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जनजागृती करण्यात करण्यात आली.आजच्या युवापिढीची ओढ फास्टफूडकडे जास्त असल्यामुळे लाथपणा, विविध आजारांना समोर जावे लागते. आपण जर नियमित व्यायाम केला तर या विविध आजारांपासून मुक्तता मिळू शकते. पण त्यासाठी नियमित व्यायाम करणे हे अतिशय महत्वाचे आहे असा संदेश उपस्थित नागरिकांना देण्यात आला.
या वेळी संस्थेतर्फे अक्षय पाटील,प्रसाद मुजुमदार,प्रतीक्षा पोहनकर,आरती पांडे,पद्मज पाटील,कार्तिक आवळे,माधुरी राव,अनित रोकडे,अंकिता कोळी,शिवानी कर्णिक,आदीत्य वाडेकर,कल्याणी टोपरे,चंद्रेश पटले,समृद्धी चांद्रायण,देवर्षी चांद्रायण,अक्षय कोकोडे,डेविन उकेबांते,अजय बांते,अनिरुद्ध शर्मा,निरंजन टोपरे,पूजा राहाटे,व्यंकटेश रहांदळे.











