Published On : Tue, Jun 19th, 2018

गोरेवाडा तलावावर ’तरंगता सोलर’ प्रकल्प

Advertisement

नागपूर : पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणारा विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. जागेच्या अभावामुळे हा सोलर प्रकल्प तलावातच उभारण्याचा विचार असून देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प म्हणून तो ओळखला जाईल.

यासंदर्भात पावरग्रीडच्या संचालक आणि अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (ता. १९) मनपा मुख्यालयातील सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, उपअभियंता दीपक चिटणीस, पावरग्रीडचे कार्यकारी संचालक संजय गर्ग, व्यवस्थापक अनुराग श्रीवास्तव, उपव्यवस्थापक डॉ. विनय सेनरे उपस्थित होते.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोरेवाडा तलावावर ३ मेगावॅट ‘फ्लोटिंग सोलर’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पावरग्रीडने नागपूर महानगरपालिकेसमोर ठेवला आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले.

या प्रकल्पाची किंमत, मनपा किती रक्कम या प्रकल्पात गुंतवेल, फायनान्स किती उपलब्ध करण्यात येईल, प्रकल्पाचा खर्च किती वर्षात निघेल आणि किती वर्ष मोफत वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल, याबाबत संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पावरग्रीडच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सर्व शक्यता तपासून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना दिले.

Advertisement
Advertisement