Published On : Thu, May 24th, 2018

पेरी अर्बन पाणीपुरवठा योजना: अतिरिक्त वितरण व्यवस्थेसाठी 8.5 कोटींना प्रशासकीय मान्यता

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule

नागपूर: नागपूर शहराच्या सीमेलगत असलेल्या दहा गावांना पाणी पुरवठ्यासाठी पेरीअर्बन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 232.74 कोटींना शासनाने मान्यता दिली असून अतिरिक्त बााब वगळून या योजनेत 206.85 कोटी रुपये खर्च होणार. साधारणत: 26.88 कोटींची बचत होणार असून बचतीच्या निधीतून 8.51 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वितरण व्यवस्थेसाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी ही योजना सुरु झाली आणि निधीही उपलब्ध झाला. बेसा, बेलतरोडी व इतर भागात विहिरी आणि हातपंप यांना पाणी नसल्यामुळे बाराही महिने पाणीटंचाई जाणवत होती. परिणामी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 28 जानेवारी रोजी झाले होते, हे येथे उल्लेखनीय. या योजनेमुळे 10 गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अतिरिक्त वितरण व्यवस्थेच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पेरीअर्बनच्या 10 गावांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. 8.51 कोटींना मंजुरी देताना शासनाने काही अटी घालून दिल्या असून त्या अटींच्या अधीन राहून या रकमेला प्रशासकीय माान्यता देण्यात आली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे या परिसरातील नाागरिकांनी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी व पालकमंत्री बावनकुळे यांचे आभार मानले आहे.

Advertisement
Advertisement