Advertisement
File Pic
मुंबई: धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर एका तरूणाने मुंबईत मंत्रालयासमोर रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अविनाश शेटे (वय 25, रा. अहमदनगर) असे या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून अविनाश शेटे मंत्रालय परिसरात फे-या घालत होता. मात्र, साडेदहाच्या सुमारास त्याने एका कॅनमध्ये रॉकेल आणले व अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले व पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश शेटे हा कृषी पदवीधारक आहे. त्याने काही वर्षापूर्वी कृषी सहाय्यक अधिकारी पदासाठीची सरकारी परीक्षा दिली होती. मात्र, सरकारकडून ही पदे भरली नव्हती त्यामुळे नोकरी लागत नसल्याच्या नैराश्यातून अविनाश शेटेने हा पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.