Published On : Tue, Feb 6th, 2018

अॅड. व्ही.जी. भांगडे यांचा आदर्श नव्या पिढीने जोपासावा: मा. महापौर नंदा जिचकार

Advertisement

आजच्या युवा पिढीला कदाचित अॅड. व्ही.जी. भांगडे यांच्याबद्दल माहिती नसेल पण नागपूरच्या विधी क्षेत्रात भांगडे परिवार मागील ७५ वर्षापासून वकिली क्षेत्रात कार्यरत असून विधी व सामाजिक क्षेत्रात दान धर्म कार्यात त्यांनी वेगळाच ठसा निर्माण केला आहे. गरिब व सामान्य गरजू मानसाकरीता त्यांनी न्यायदानाचे महान कार्य केलेले आहे. आज पण भांगडे परिवारातील ६ वकील अजूनही उच्च न्यायालयात वकीलीचे कार्य सामाजिक बांधीलकीने व निष्ठापूर्वक करीत असून व्ही.जी. भांगडे हे उच्च विधी विभूषीत होते. त्यांनी लेबर, टॅक्सेसन, काऊन्टयुशनल लॉ या तीन विषयात एल.एल.एम. ही विधी विभागाची उच्च परिक्षा गुणानुक्रमे उत्तीर्ण केली होती. त्यावेळेस लिमका बूक रेकॉर्ड नोंद घेण्यात आलेली होती. त्यांनी विधी क्षेत्रात नागपूर शहराचे नाव लौकिक केले आहे ते वकिली व्यवसायासोबतच ते नागपूरच्या लॉ कॉलेजमध्ये ऐव्हीडंस या विषयाचे प्राध्यापक ही होते. व्ही.जी. भांगडे त्यांचा आदर्श नव्या पिढीने जोपासावा असे मनोगत महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. व्ही.जी. भांगडे मार्गाच्या नामकरण प्रसंगी व्यक्त केले.

सिव्हील लाईन स्थित मा. उच्च न्यायालय पूर्वे कडील व्दारा समोरुन मेट्रो मुख्यालयकडे जाणारा मार्गाला अॅड. व्ही.जी. भांगडे मार्ग असे नामकरण आज दि. ०६ फेब्रुवारी २०१८ संपन्न झाला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नगरसेवक श्री. किशोर जिचकार, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती प्रगती पाटील, नगरसेवक श्री. निशांत गांधी, नगरसेविका श्रीमती शील्पा धोटे, धरमपेठ झोनचे सहा. आयुक्त श्री. महेश मोरोणे, ज्येष्ठ अॅड. एम.जी. भांगडे, अॅड. राजू किनखेडे, अॅड. व्ही.जी. भांगडे यांची पत्नी श्रीमती गिता भांगडे, अॅड. राजू किनखेडे, अॅड. विवेक भांगडे, अॅड. आर.एम. भांगडे, श्रीमती टिना जिचकार, अॅड. अशोक भांगडे, अॅड. बाबा सिध्दीकी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

प्रारंभी मा. महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी विधीवत पूजा अर्चना करुन नामकरण शीलालेखावरील पडदा बाजूला सारुन लोकार्पण केले.

यावेळी प्रास्ताविकातून माहिती देतांना नगरसेवक श्री. किषोर जिचकार यांनी अॅड. भांगडे यांच्या जिवन कार्याचा परिचय देतांना म्हणाले की, अॅड. व्ही.जी. भांगडे यांनी गरीबांसाठी न्याय मिळवून देण्याचे कार्य केले असून त्यांनी ५० वर्षे उच्च न्यायालयात वकिली केलेली होती, ते महेष्वरी समाजाच्या विविध संघटनाचे विष्वस्त व दानशुर म्हणून त्याचा नावलौकिक आहे व शहरातील प्रतिष्ठीत परिवार असून अॅड. भांगडे यांच्या सेवाभावी कार्याची माहिती विषद केली. यावेळी भांगडे परिवारातर्फे अॅड. अशोक भांगडे यांनी म.न.पा. ने रस्त्यांचे नामकरण केल्याबद्दल म.न.पा.चे व महापौरांचे धन्यवाद व्यक्त केले.

पाहुण्याचे स्वागत सहा. आयुक्त श्री. महेष मोरोणे, संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. अशोक कोल्हटकर यांनी केले. शेवटी सर्वाचे आभार नगरसेवक श्री.निशांत गांधी यांनी मानले. यावेळी भांगडे परिवारातील ब्रजेश कुमार खेमका, मेघना खेमका, पियुष बंडोरीया, रेणू बंडोरीया, निलेश जिचकार व परिसरातील व भांगडे परिवारातील गणमान्य नागरीक उपस्थित होते.