Published On : Sun, Dec 31st, 2017

नागझिरा जंगलात नववर्ष साजरा करणाऱ्या पर्यटकांना नक्सल्यांकडून धमकी 

Advertisement

गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभवात नागझिरा अभयारण्याचा मोलाचा वाटा आहे. या जंगलात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नववर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने नागझिरा जंगल परिसरात दाखल झाले आहे. मात्र या पर्यटकांना यावर्षी नक्सल्यानीच धमकी दिली असून, साकोलीकडून नागझिराकरीता जाणाऱ्या पिटेझरी मार्गावर लाल सलाम,नागझिरा बंद,”नागझिरा मे आके देखो” असे लिहिलेले फलक लावले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

गेल्या काही तीन चार दशकापुर्वी नागझिरा परिसरात याच नागझिऱ्याच्या नावाने नक्षल्यांचा एक दलम कार्यरत होता. परंतु मधल्या काळात या दलमचे संपुर्ण उच्चाटन करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले होते. त्यामुळे नागझिरा अभयारण्याचा परिसर हा नक्षलमुक्त परिसर झालेला होता. परंतु अद्यामध्यात नक्षल्यांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याने पुन्हा शांत असलेल्या नागझिऱ्यात नक्षल्यांची वर्दळ सुरु झाल्याची शंका निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी सुध्दा नक्सलवाद्यांनी वनविभागाच्या साहित्याची नासधुस केली होती. त्यातच आज ३१ डिसेंबरला वर्षाच्या शेवटी नक्षल्यांनी साकोलीकडून नागझिराकरीता जाणाऱ्या पिटेझरी मार्गावर लाल सलाम,नागझिरा बंद,”नागझिरा मे आके देखो” असे लिहिलेले फलक लावले आहे.

लाल कपडयावर नागझिरा बंद लिहिलेले बॅनर तुली सुटसच्या लोखंडी खांबाला बांधले असल्याचे आढळून आले. मात्र त्या बॅनरवर कुठल्या दलमने हे बॅनर लावले याचा उल्लेख मात्र स्पष्ट नसल्याने हे बॅनर नक्षल्यांनीच लावले की कुणी खोळसाळ पणा करुन पोलीसांना त्रास देण्याचा प्रयत्न केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. एकोडी आणि पिटेझरीकडे जाणाऱ्या टि पाँईटवर हे फलक लावण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. बॅनर लावलेल्या भागाकडे साकोली पोलीसांची व जवानांची कुमक रवाना झाले आहे. 

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बॅनर संदर्भात पोलीस अधिक्षक  विनीता शाहू , साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत दिसले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यातच नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा आज गोंदिया जिल्हात दौरा आहे. नक्सल्यांनी लावलेल्या धमकीवजा फलकाने नववर्ष साजरा करणाऱ्या पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisement
Advertisement
Advertisement