Advertisement
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास येथे १५ ऑगस्ट रोजी ७० वा स्वांतत्र्य दिवस साजरा करण्यात आला. नासुप्रचे सभापती डॉ.दिपक म्हैसेकर यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन सलामी दिली व समस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र दिनाच्या शुभेछा दिल्या. यावेळी महाप्रबंधक मिलिंद साळवे,अधिक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार,अधिक्षक अभियंता(प्रकल्प) राजीव पिंपळे, सहाय्यक संचालक नगररचना सुनिता अलोणी, कार्यकारी अधिकारी सुशांत झाडे , सचिव-१ गीते, सचिव-२ बाविस्कर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहनाच्या कार्यक्रमात प्रगतीचा बुलंद नारा देऊन स्वातंत्र्याचा सोहळा संकल्प सोहळा म्हणून साजरा केल्या गेला.