Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भीषण अपघात;इलेक्ट्रिक बसखाली दुचाकीस्वाराचा मृत्यू

Advertisement

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा वेगाने जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. संविधान चौकाजवळील मॉरिस कॉलेज बसस्टॉपसमोर इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार रितेश सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला.

काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश सातपुते हे दुचाकीवरून सिग्नल ओलांडून झिरो माईलकडे जात होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव इलेक्ट्रिक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते खाली पडले आणि बसच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपजीविकेसाठी निघाले, पण परतले नाहीत.
रितेश सातपुते हे औषध वितरणाचे काम करत होते. रोजच्या कामासाठी बाहेर पडलेल्या सातपुते यांचा हा प्रवास अखेरचा ठरला, त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बसचालक ताब्यात, तपास सुरू-
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालक शेख सरवर शेख सगीर याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न-
संविधान चौक ते मॉरिस चौक हा पट्टा आधीपासूनच अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथील वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नागरिकांची मागणी काय?
या ‘धोकादायक चौका’त तातडीने सिग्नल सुधारणा, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि कडक वाहतूक नियंत्रण उपाय राबवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement