Published On : Tue, Apr 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ; बारबाहेर चाकू-रॉडने जीवघेणा हल्ला,

Advertisement

नागपूर : शहरात कायदा व सुव्यवस्थेला उघडपणे आव्हान देत मध्यरात्री गुंडांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून एका बारबाहेर झालेल्या वादाने काही क्षणातच हिंसक रूप धारण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अकीन हे आपल्या मित्र मोहम्मद सिराज यांच्यासोबत ‘हायवे बार अँड रेस्टॉरंट’ येथे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी काही आरोपींनी जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरण्याची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाले.

Gold Rate
Apr 21 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,800 /-
Gold 22 KT ₹ 1,43,000 /-
Silver/Kg ₹ 2,53,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर आरोपींनी बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून हातात लोखंडी रॉड व चाकू घेऊन रस्त्यावरच मारहाण सुरू केली. फिर्यादी व त्यांच्या मित्रावर तुफान हल्ला करत चाकूने जीवघेणे वार करण्यात आले. तसेच त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.

घटनेदरम्यान आरोपींनी उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, त्यामध्ये आरोपी रस्त्यावरच दहशत माजवताना स्पष्ट दिसत आहेत.

या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अजहर, हुसेन उर्फ अरमान लोचा, राजा हिरोती, फरहान उर्फ फर्रा, पिंटू, इरफान शेख आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांची नावे समोर आली आहेत. मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागपूरात गुंडाराज वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement