Published On : Sat, Apr 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; अहिल्यानगरच्या इन्फ्लुएंसरवर नागपुरात गुन्हा

Advertisement

नागपूर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून मंत्र्यांच्या पत्नीची बदनामी केल्याच्या आरोपावरून अहिल्यानगर येथील इन्फ्लुएंसर रवीराज साबळे पाटील याच्याविरुद्ध कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महाडुला येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी हेमलता ठाकूर (वय 36) यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. संबंधित व्हिडिओंमधून ज्योती बावनकुळे यांच्याविषयी अपमानास्पद व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच ठाकूर यांनी पुढाकार घेत पुरावे गोळा करत पोलिसांकडे धाव घेतली.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुरुवातीला सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे तक्रार देण्यात विलंब झाला होता. मात्र, नंतर सोशल मीडियावरील व्हिडिओ क्लिप्ससह महत्त्वाचे डिजिटल पुरावे सादर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील स्टॉकिंग, महिलेच्या सन्मानाचा अपमान आणि मानहानीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अश्लील मजकूर प्रसारित केल्याचे कलम लावले आहेत.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधित सोशल मीडिया खात्यांची पडताळणी आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement