Published On : Fri, Apr 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात ‘आपली बस’ घोटाळा उघड; 32 लाखांची वसुली,तीन ऑपरेटरांवर गुन्हा दाखल

Advertisement

Aapli Bus

नागपूर : शहरातील ‘आपली बस’ सेवेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने थेट अ‍ॅक्शन घेत तीन बस ऑपरेटरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, तब्बल ३२ लाखांहून अधिक रकमेची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन समितीच्या बैठकीत हा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला. बस सेवा संपल्यानंतर स्क्रॅप प्रक्रियेदरम्यान अनेक बसमधील चेसिससह महत्त्वाचे भागच गायब असल्याचे समोर आले. म्हणजेच, बस उभ्या होत्या पण आतून ‘रिकाम्या’ केल्याचा प्रकार उघड झाला.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाकडून वारंवार नोटिसा देऊनही संबंधित ऑपरेटरांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे संतप्त प्रशासनाने थेट फौजदारी कारवाईचा मार्ग निवडला. आता या तिन्ही ऑपरेटरांकडून लाखोंची वसुली केली जाणार असून, पैसे न भरल्यास त्यांच्या देयकातूनच रक्कम कापली जाणार आहे.

या प्रकरणानंतर मनपाही सावध झाली असून, बस डेपोमधील चोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. शहरातील विविध डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत.

‘आपली बस’सारख्या सार्वजनिक सेवेतच असा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कारवाईनंतर तरी गैरव्यवहारांना आळा बसेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement