Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी स्वीकारला पदभार

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री.अंकित (भा.प्र.से) यांनी सोमवारी (ता.०६) पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी श्री. अंकित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून श्री.अंकित (भा.प्र.से) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांची सदिच्छभेट घेतली. यावेळी महापौर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी श्री.अंकित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Gold Rate
Apr 18 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,200 /-
Gold 22 KT ₹ 1,43,500 /-
Silver/Kg ₹ 2,59,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. अंकित हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या सन २०१९ बॅचचे अधिकारी असून महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली येथून मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement