Published On : Wed, Apr 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

अकोल्यात पोलीस कोठडीत महिलेकडे ‘शरीरसुखा’ची मागणी; एएसआयविरोधात गुन्हा

Advertisement

अकोला : पोलीस दलाची प्रतिमा डागाळणारी गंभीर घटना अकोल्यात उघड झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने ‘शरीरसुखा’ची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.

Gold Rate
Mar 30,2026 - Time 10.26Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,500 /-
Gold 22 KT ₹ 1,39,500 /-
Silver/Kg ₹ 2,33,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक केल्याच्या प्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावल्याने तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. याच दरम्यान संबंधित अधिकाऱ्याने महिलेकडे अश्लील मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने ही बाब महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्यानंतर प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले.

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्याची कानउघडणी केली. दरम्यान, या आरोपांची सखोल चौकशी सुरू असून, प्रकरणातील सत्यता तपासण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस विभागात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement