Published On : Tue, Mar 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात आयकर विभागाची मोठी कारवाई; ट्रांसरेलसह संविजय कंपनीवर छापेमारी

Advertisement

नागपूर : शहरातील औद्योगिक क्षेत्रात आज मोठी खळबळ उडाली असून आयकर विभागाने ट्रांसरेल आणि संविजय या प्रसिद्ध स्टील व अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांवर एकाच वेळी धाड टाकली आहे. सकाळपासूनच अधिकाऱ्यांच्या पथकांनी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कंपन्यांपैकी एका कंपनीने अलीकडेच चंद्रपूर येथील दोन प्लांटची विक्री केली असून नागपूरमधील एक प्लांटही विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता किंवा कर चुकवेगिरीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे समजते.

Gold Rate
Mar 30,2026 - Time 10.26Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,500 /-
Gold 22 KT ₹ 1,39,500 /-
Silver/Kg ₹ 2,33,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूत्रांच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांकडून कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, बँकिंग नोंदी, महत्त्वाची कागदपत्रे तसेच प्लांट विक्रीसंदर्भातील सर्व व्यवहारांची सखोल तपासणी केली जात आहे. अनेक ठिकाणी एकाच वेळी सुरू असलेल्या या कारवाईमुळे औद्योगिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या छापेमारीबाबत संबंधित कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आयकर विभागाच्या पुढील तपासातून या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement