Published On : Mon, Feb 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘चप्पल मारो’ आंदोलन; शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी टीपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले.

महल परिसरातील गांधी गेट येथे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा आहे, त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी हर्षवर्धन सपकाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निषेध व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी सपकाल यांच्या छायाचित्रांवर चप्पल फेकून संताप व्यक्त केला.

Gold Rate
Feb 16th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,600 /-
Gold 22 KT ₹ 1,43,800 /-
Silver/Kg ₹ 2,39,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, अशा प्रकारची तुलना करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी सपकाल यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, जोपर्यंत सपकाल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना नागपूर शहरात प्रवेश करू देणार नाही, असा इशाराही काही भाजप नेत्यांनी दिला आहे. या घटनेमुळे नागपुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement