Published On : Fri, Feb 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्य मंत्रालयात मोठी कारवाई; मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक ३५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला

Advertisement

मुंबई: मंत्रालयात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ACB अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. संबंधित लिपिकाने परवाना नूतनीकरणासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीअंती प्रथम ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला जागीच पकडले.

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटकेनंतर तपासासाठी मंत्री कार्यालय सील करण्यात आले असून, कागदपत्रांची तपासणी व पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

कार्यालयातील आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृतरीत्या कोणतीही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित लिपिकाची कृती ही वैयक्तिक असल्याचे सांगितले. तपासात आपला कोणताही संबंध आढळल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विरोधी पक्षाने या घटनेवरून सरकारवर टीका करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement