Published On : Fri, Feb 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदचे चौथे संस्करण १४–१५ फेब्रुवारीला

Advertisement

नागपूर-विकासार्थ विद्यार्थी आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी (PSG) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद (NEYP) 2026 चे चौथे संस्करण १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथील विधानभवनात आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे देशभरातील युवकांना पर्यावरण संरक्षण, धोरणात्मक विचार आणि हरित नेतृत्वासाठी प्रभावी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

विकासार्थ विद्यार्थी ही वर्षभर विद्यापीठ परिसरात पर्यावरण विषयक जनजागृती, अभ्यास आणि कृती यासाठी कार्यरत असलेली चळवळ आहे. सकारात्मक विकासाच्या दृष्टीने जल, जन, जंगल, जमीन आणि जानवर या पाच ज्वलंत विषयांवर संघटना सातत्याने काम करत आहे. २०२२ पासून राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद आयोजित करून पर्यावरण विषयांवरील युवकांची भूमिका धोरणात्मक चर्चांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तीन टप्प्यांत आयोजन-
राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद २०२६ चे आयोजन तीन टप्प्यांत करण्यात आले आहे.प्रथम टप्पा सप्टेंबर २०२५ मध्ये विद्यापीठ स्तरावर पार पडला असून, देशातील सुमारे ४०० विद्यापीठांतील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.द्वितीय टप्प्यात निवड झालेल्या ४,००० विद्यार्थ्यांनी देशातील १० हवामान विभागांमध्ये सहभाग नोंदवला. या टप्प्यातून उत्कृष्ट सहभागींची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली.
अंतिम टप्प्यात सुमारे २०० निवडक विद्यार्थी १४–१५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय पर्यावरण संसदेत सहभागी होऊन देशव्यापी पर्यावरणीय समस्यांवर आणि उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.

विषयक सत्रांमध्ये सखोल चर्चा-
या युवा संसदेत विविध विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्र १: पंच-परिवर्तन आणि जलवायु शासन आधुनिक धोरणात्मक चौकटीत भारताच्या पारिस्थितिक बुद्धीचे पुनरुज्जीवन या विषयावर चर्चा होणार आहे.
सत्र २: COP30 मध्ये भारत आणि विश्व भारतीय सभ्यतागत शाश्वततेचे मूल्य जागतिक जलवायु नेतृत्वाला दिशा देऊ शकतात का, यावर विचारमंथन होईल.जलसंधारण, वायू प्रदूषण, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल चर्चा आणि मंथनाची संधी मिळणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती-
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. देवदत्त जोशी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू मा. डॉ. मनाली क्षीरसागर यांचा समावेश आहे. देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शन आणि सांस्कृतिक सादरीकरण
संसदेअंतर्गत आयोजित प्रदर्शनामध्ये पर्यावरणीय संस्कार आणि विदर्भातील जनजातीय परंपरांचे दर्शन घडवले जाईल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विदर्भाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सादर केला जाणार आहे.

ही युवा संसद सहभागी विद्यार्थ्यांना धोरणनिर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रेरित करेल आणि ते आपल्या विद्यापीठ परिसरात ‘पर्यावरण दूत’ म्हणून कार्य करतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला विकासार्थ विद्यार्थी गतिविधीच्या अखिल भारतीय संयोजिका कु. पायल राय यांनी संबोधित केले. यावेळी नागपूर महानगर मंत्री विरेन्द्र पौणीकर तसेच प्रांत मीडिया संयोजक वैष्णवी पांडेय उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement