Published On : Fri, Feb 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ऑपरेशन ‘थंडर’अंतर्गत कारवाई; १.२० लाखांचा एमडीसह एका आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ०४ पथकाने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई करत १० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह एकाला अटक केली आहे. ही कारवाई ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.१० ते ८.४० वाजण्याच्या दरम्यान वाटोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

राजनगर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी हटकले. तो घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून १० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, अंदाजे किंमत १ लाख रुपये, तसेच विवो आय ३०० प्लस मोबाईल (किंमत सुमारे २० हजार रुपये) असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी मोहम्मद नियाज मोहम्मद समशुल अन्सारी (वय ३२, रा. प्लॉट क्र. ७२, राजनगर, वाठोडा) याला अटक करण्यात आली आहे. तर फैजल शेख (वय २७, रा. शिवणकर नगर, नंदनवन) हा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८(क), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचासमक्ष पंचनामा करून पुढील तपास वाटोळा पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक, युनिट ०४, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement