Published On : Sat, Feb 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ, प्रक्रिया जाणून घ्या

Advertisement

नागपूर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. e-KYC प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका सुधारण्यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांना पुन्हा एकदा संधी दिली असून, त्यामुळे आतापर्यंत लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती देत e-KYC दुरुस्तीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, काही महिलांकडून e-KYC करताना चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांच्या अर्जांवर पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही. e-KYC पूर्ण करूनही योजना लाभ मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र लाभार्थींना न्याय मिळावा, यासाठी e-KYC तपशील दुरुस्त करण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिला व बालविकास विभागानुसार, अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC माहितीमध्ये सुधारणा करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या नोंदींमध्ये त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनी दिलेल्या कालावधीत दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

e-KYC दुरुस्तीची प्रक्रिया-
लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर लॉगिन करा.
👉 ‘e-KYC मध्ये चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थ्यांसाठी संधी’ या पर्यायावर क्लिक करा.
👉 त्यानंतर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी.
👉 सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी.

विभागाने स्पष्ट केले आहे की, चुकीची माहिती दिल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे e-KYC दुरुस्ती करताना लाभार्थ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी.

एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हा शासनाचा उद्देश असून, लाडक्या बहिणींनी मुदतीआधी e-KYC दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement