Published On : Wed, Feb 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सावनेर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघड!

Advertisement

नागपूर: सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलकांमटीजवळील सरोडी टोला गावात तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओच्या आधारे पीडित मुलीला ब्लॅकमेल करून मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मात्र ‘१०९८’ बाल हेल्पलाईनच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिन्ही आरोपी एकाच गावातील रहिवासी असून ते परस्परांचे दूरचे नातेवाईक आहेत. ऑक्टोबर २०२५ पासून हा छळ सुरू झाला होता आणि जानेवारी २०२६ पर्यंत आरोपींनी पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या कृत्यानंतर आरोपींनी मोबाईल फोनवर व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला सतत ब्लॅकमेल केलं.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे पीडिता प्रचंड तणावाखाली होती. अखेर आत्महत्येचा विचार करत असताना तिने धैर्य दाखवत १०९८ बाल हेल्पलाईनवर संपर्क साधून आपबीती सांगितली. त्यानंतर महिला व बालकल्याण समिती आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करत पीडितेला सुरक्षित ठिकाणी हलवले.

या प्रकरणी सावनेर पोलिस ठाण्यात तिन्ही अल्पवयीन आरोपींविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून पीडितेला समुपदेशन आणि आवश्यक संरक्षण देण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement