Published On : Tue, Feb 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

पेंचमध्ये वाघाच्या शिकारीप्रकरणी ६ आरोपींना सश्रम कारावास

Advertisement

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रात वाघाला विद्युत प्रवाह लावून ठार मारल्याच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने ६ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. बोराणी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.

या प्रकरणात ५ आरोपींना प्रत्येकी ३ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास ९ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच इतर कलमान्वये २ वर्षांची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आणखी एका आरोपीस २ वर्षांची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंड, तर एका आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणाचा तपास तत्कालीन क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी व डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे व सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विहित कालावधीत निकाल देण्यात आला. न्यायालयाने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून ११३ दस्तावेज व ३७ साहित्य पुरावे तपासण्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement