Published On : Tue, Feb 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

विज्ञान मॉडेल स्पर्धेत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी सुरेंद्रगड शाळेला दोन मोठी पारितोषिके

Advertisement


नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या जोरावर ‘एचसीएल फाउंडेशन’ आणि ‘यंग कलाम डिस्कव्हरी सायन्स सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान मॉडेल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. यात सुरेन्द्रगड मनपा शाळा, एम.ए.के.आझाद उर्दू माधामिक शाळा, वाल्मिकी नगर शाळा, पी एम श्री संजय नगर शाळा, विवेकानंद नगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कार्य केले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या देखरेखीत सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती दीप्ती बिष्ट यांच्यासह श्रीमती प्रणाली बगले, श्रीमती बरखा जायसवाल आणि श्रीमती स्वाती जोशी या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे मोलाचे मार्गदर्शन केला आहे. शिक्षिकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांच्या स्पर्धेत आपले वेगळेपण सिद्ध केले. मनपा शाळेतील मुलांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मारलेली ही उत्तुंग भरारी शहरातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. मनपाच्या २२ शाळांनी आपल्या कल्पकतेतून ४४ विज्ञान मॉडेल तयार केले असून, यातील ६ मॉडेलला परितोषिक प्रदान करण्यात आले.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्पर्धेच्या माध्यमिक गट: दिव्यांश आणि प्रदीप यांनी आपल्या मॉडेलद्वारे उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर, प्राथमिक गट गौरव आणि सत्यनारायण यांनी द्वितीय स्थान मिळवून शाळेच्या यशात भर घातली. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांच्या विज्ञानावर आधारित मॉडेल्सचे परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

या यशाबद्दल शाळेला आणि विद्यार्थ्यांना रोख रकमेसह सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी १०,००० रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी ७,००० रुपये रोख बक्षीस देण्यात आले. यासोबतच शाळेला मानाची सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
अधिक माहिती:

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement