
मुंबई : महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे हप्ते जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबरच्या रकमेची प्रतिक्षा सुरू आहे.
नोव्हेंबरचा हप्ता उशिरा का?
माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याची रक्कम अद्याप अनेकांच्या खात्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने नोव्हेंबर आणि डिसेंबर – दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, लाभार्थ्यांच्या खात्यात एकदाच ३००० रुपये जमा होऊ शकतात.
३००० रुपये नेमके कधी जमा होतील?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यामुळे देयक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
आचारसंहिता उठल्यानंतर, म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५ ते ३१ डिसेंबर) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते जमा होण्याची शक्यता आहे.
अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रशासनिक स्तरावर हालचाल सुरू असल्याचे समजते.
KYC प्रक्रिया अनिवार्य-
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.
यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
KYC न केल्यास लाभार्थ्यांना हप्ता थांबू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या या ३००० रुपयांच्या हप्त्याकडे लागले आहे.









