
सलील देशमुख यांच्याकडे पक्ष संघटनेत कोणतेही प्रमुख पद नव्हते, मात्र त्यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून उमेदवारी घेतली होती. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला.
आज पत्रकार परिषदेत बोलताना सलील देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाच्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांतील गणितांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आता पक्ष त्यांची मनधरणी करतो का, किंवा काही महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









