Published On : Tue, Nov 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ मध्ये गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने संपन्न!

- लाडक्या बाप्पाच्या जयघोषाने वातावरण चैतन्यमय
Advertisement

नागपूर: गणपती बाप्पा मोरया, ओम गणपतये नमः च्या जयघोषात हजारोंच्या संख्येने आबालवृद्धांनी मंगळवारी गणपती अथर्वशीर्षाच्या 21 आवर्तनात सहभाग घेतला. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात गणपती अथर्वशीर्षाच्या आवर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एका स्वरातील गणपती अथर्वशीर्षाने वातावरण अत्यंत सकारात्मक आणि चैतन्यपूर्ण झाले.

तत्पूर्वी, पारंपरिक दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला संस्कार भारतीच्या अध्‍यक्ष कांचनताई गडकरी, खासदार सांस्कृतिक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय शारीरिक स्वास्थ्य विभाग प्रमुख मनीषा संत, गायत्री औद्योगिक पतसंस्थेच्या संचालिका विजयाताई भुसारी, टेकडी गणेश मंदिराचे विश्वस्त दिलीपजी शहाकार, भागवताचार्य मोहिनी देवपुजारी, कराटे कोच धनश्री जोशी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत योगिनी कोमेजवार, मायाताई हाडे, शाम निसाळ, नीरजा पाटील, नलिनी वंजारी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

Gold Rate
10 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,800 /-
Gold 22 KT ₹ 1,13,300 /-
Silver/Kg ₹ 1,52,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुरुवातीला सहज योग तर्फे योगाभ्यास आणि त्याची प्रात्यक्षिके करण्यात आली. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनि देखील प्रात्यक्षिके केली. योगाचा ‘मानव सूक्ष्म तंत्र’ यावर काय परिणाम होतो हे देखील समजावून सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement