
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी आज (५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील २७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी एकूण ७.३२ लाख मतदार मतदान करणार असून, यासाठी ८९१ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या निवडणुकांसाठी आवश्यक सर्व तांत्रिक व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख आकडेवारी-
घटक संख्या
नगरपरिषद / नगरपंचायती २७
एकूण निवडणूक प्रभाग ३७४
सदस्यसंख्या ५४६
नगराध्यक्ष पदे २७
एकूण मतदारसंख्या ७,३२,१३२
मतदान केंद्रे ८९१
निर्णय अधिकारी २७
सहायक निर्णय अधिकारी २७
आवश्यक कर्मचारी संख्या ४,४५५
एकूण ईव्हीएम संच २,१५६ BU व १,०७८ CU
महत्त्वाच्या नगरपरिषदा व मतदारसंख्या-
कामठी – ८८,६३९ मतदार, १०० मतदान केंद्रे
वाडी – ५९,५३७ मतदार, ६८ केंद्रे
उमरेड – ४७,१८७ मतदार, ६० केंद्रे
वानाडोंगरी – ४८,२६७ मतदार, ५१ केंद्रे
डिगडोह (देवी) – ३३,३८० मतदार, ३९ केंद्रे
सावनेर – ३३,९१९ मतदार, ४२ केंद्रे
कळमेश्वर-ब्राम्हणी – २९,८८० मतदार, ३९ केंद्रे
बुटीबोरी – ३२,२४८ मतदार, ४० केंद्रे
प्रशासकीय तयारी-
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येक नगरपरिषदेकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी आणि एक सहायक अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांवर सुमारे ४,४५५ कर्मचारी तैनात राहतील.
ईव्हीएम यंत्रांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून, एकूण २,१५६ बॅलेट युनिट (BU) आणि १,०७८ कंट्रोल युनिट (CU) जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी इटनकर यांचे वक्तव्य- निवडणुकीत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी सर्व विभागांचे समन्वय साधण्यात आला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले.









