Published On : Tue, Nov 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कळमना पोलिसांची मोठी कारवाई

७ आरोपींचा पर्दाफाश, चारचाकी वाहनांसह ३० लाखांचा माल जप्त
Advertisement

नागपूर : विदेशी दारूचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्या टोळीचा कळमणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली असून, ४ चारचाकी वाहने, १३५ लिटर विदेशी दारू आणि विविध साहित्य असा मिळून ३० लाख ३७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कळमणा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

अशी उघडकीस आली टोळी-
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माहिती मिळाली की, महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ४९ बी.झेड. ५३२८) या वाहनात ट्रव्हल परमिटशिवाय विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे. सपोनि शशिकांत मुसळे यांच्या पथकाने चिखली चौक परिसरात सापळा रचून वाहन पकडले. तपासात वाहनातून SEAGRAM’S ROYAL STAG नावाच्या विविध बॅचच्या दारूच्या पेट्या सापडल्या. चालक महेंद्र बांबल कडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दारू बनावटीकरणाची गुंतागुंतीची पद्धत-
तपासात उघड झाले की आरोपी महेंद्र बांबल आणि निखील उर्फ निक्कू नाटकर हे नारायण उर्फ बंटी मोघरकर याच्याकडून विदेशी दारू आणत. हे आरोपी मूळ वाईन शॉपमध्ये पोहोचविण्यापूर्वी बाटल्यांचे सिल काढून दारू थोडीथोडी चोरी करत आणि त्याजागी पाणी भरून पुन्हा सिलबंद करत.
चोरी केलेली दारू ते कबाडीतून विकत घेतलेल्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी मिसळून भरत आणि ओरिजनल सिल लावून ती दारू बनावट स्वरूपात विकत असत. अशाप्रकारे १ लिटर दारूवरून १८० एमएलच्या सात बाटल्या तयार करून ते वाईन शॉपमध्ये ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करत असत.

पोलिसांनी उघडकीस आणले मोठे रॅकेट-
आरोपींच्या कबुलीजबाबानुसार, या टोळीत इब्राहिम पठाण, रोशन शाहु, गजेन्द्र शाहु यांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी या आरोपींच्या घरांवर छापा टाकून तीन चारचाकी वाहने, १३५ लिटर बनावट दारू, बाटल्या व सिलबंद साहित्य जप्त केले.

सरकारी महसुलाला मोठा फटका-
या टोळीमुळे सरकारचा दारूवरील महसूल बुडत होता. आरोपी हे मागील तीन वर्षांपासून नागपूर शहरातील विविध वाईन शॉप व बारमध्ये बनावट विदेशी दारूची विक्री करत होते. सध्या सर्जा वाईन शॉप आणि शेखर वाईन शॉप येथील काही कामगारांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी-
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी राठोड, पोलीस उप आयुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि शशिकांत मुसळे, पोहवा प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी, अजय गटलेवार, अनिल जाधव, मंगेश लोही, प्रफुल गोहेकर आणि सायबर टीमचे आशिष पिपरहेट यांचा सहभाग होता. पुढील तपास सपोनि मुसळे करत आहेत.

Advertisement
Advertisement