नागपूर : अॅन्जेल लेडीज क्लबने आपल्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य आणि सांस्कृतिक सोहळा आयोजित करत विदर्भातील महिलांसाठी आनंदाचा उत्सव ठरवला. या कार्यक्रमात संपूर्ण विदर्भातून ३५० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या ‘पिंक क्वीन’ फॅशन शोमध्ये स्पर्धक महिलांनी विविध पारंपरिक व आधुनिक पोशाख सादर करत रंगत आणली. यामध्ये राजनी भ्रमणे यांनी ‘पिंक क्वीन’चा किताब पटकावला.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्टॉल्स, खेळ, नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी झालेल्या नृत्य स्पर्धेत महिलांचा जोश पाहण्यासारखा होता. एकंदरीतच हा कार्यक्रम सामाजिक एकत्रीकरण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक ठरला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये निलीमा बवने (अध्यक्ष, दि पंचवटी महिला मल्टीस्टेट, नागपूर) यांचा समावेश होता.
सेलिब्रिटी पाहुणे :
प्रदीप पाली (प्रोड्यूसर व कास्टिंग डायरेक्टर, झी टीव्ही)
साक्षी रेवतकर (मिस इंडिया एनिग्मा 2024 विजेती)
विशेष सन्माननीय पाहुणे :
श्रीमती सोनाली मुखर्जी (मिसेस महारानी स्पर्धा नागपूर विजेती 2025)
प्रियंका पखडे (प्रियंका मेकअप अँड ब्यूटी सैलून)
डॉ. आदर्श अंडे (बीएएमएस एमडी, डर्माक्योर, स्किन हेअर अँड वेलनेस सेंटर, नागपूर)
डॉ. प्रीती गहूकार (हेल्थ अँड न्यूट्रिशन संशोधिका, कम्युनिटी हीलिंग सॉल्यूशन्स संस्थापक)
श्रीमती सरिका मंगालकर (मालक, मंगालगौर ज्वेलर्स)
दर्शना नवघरे (शाइन इंटरनॅशनल ब्यूटी अवॉर्ड विजेती, मेकअप आर्टिस्ट)
डॉ. सरिका शाह (मिस युनायटेड नेशन्स 2019 विजेती)
डॉ. अमरापाली वासनिक (ऑनलाइन रिसर्च / रीडिंग कोच)
प्रज्ञा मोदी (मोदी ऑप्टिकल, मालक)
पूजा भांगरिया (एस्ट्रो एनर्जी फाउंडर – वास्तु, टैरो, न्यूमरलॉजी सल्लागार)
राधिका गुप्ता (पत्रकार)
या कार्यक्रमातून महिलांच्या नेतृत्वगुणांना चालना देणाऱ्या उपक्रमांची उजळणी झाली. अॅन्जेल लेडीज क्लबच्या या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून, पुढील वर्षीही असेच उपक्रम आयोजित करण्याचा निर्धार क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला.