Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोरोनाचा उद्रेक; उपचारादरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा ७ वर

नागपूर : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेषतः नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना मृतांचा आकडा आता सातवर गेला आहे.

सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ६४ वर्षांच्या नागपूरमधील एका वृद्धाचा समावेश आहे, तर दुसरा रुग्ण भंडारा जिल्ह्यातील ५९ वर्षीय पुरुष होता. दोघांचेही मृत्यू उपचार सुरू असताना झाले.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि संभाजीनगर या शहरांनंतर आता नागपूरमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागपूरमधील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ६० हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यातील २० जण सध्या सक्रिय रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण घरीच विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) उपचार घेत आहेत. पाच रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोग्य प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी केंद्रे आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे घाबरण्याची गरज नाही, पण लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Advertisement