Published On : Fri, Jun 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चार घरफोड्या उघडकीस, दोघांना अटक

Advertisement

नागपूर – शहरातील यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कबुलीजबाबावरून चार घरफोड्यांचा तपशील समोर आला आहे. पोलिसांनी सुमारे ₹5.68 लाखांचे चोरीचे मालमत्ता जप्त केली आहे.

4 मे रोजी रात्री शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्ता नगर येथे राहणाऱ्या किशोर मारोती निमजे यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. त्या वेळी संपूर्ण कुटुंब लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते आणि त्यांची मुले शेजारील घरात झोपली होती. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला आणि ₹1 लाख रोख रक्कम व ₹6.02 लाखांचे सोन्याचे दागिने चोरले.

Gold Rate
17 June 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,07,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे कुख्यात चोर राहुल राजू हटेवार याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि निकेश बलराज शाहू व ‘बाली’ नावाच्या इतर साथीदारांची माहिती दिली. पोलिसांनी निकेश शाहू यालाही अटक केली असून चौकशीत त्यांनी यशोधरानगर परिसरात एकूण चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे ₹5.68 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून तपास सुरु आहे.

Advertisement
Advertisement