Published On : Sun, Jun 8th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दिवसा ढवळ्या ५.५० लाखांची लूट; निवृत्त पीएसआयच्या गाडीला टार्गेट

Advertisement

नागपूर :शहराच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा ढवळ्या ५.५० लाख रुपयांची धक्कादायक लूट झाली आहे. वर्धमान नगरमधील स्टेट बँकेमधून पैसे काढून परतणाऱ्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) कारमधून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ही रक्कम लांबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र गणवीर हे पोलीस विभागातून पीएसआय पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत. ते आपल्या मुलासोबत कारमधून वर्धमान नगर येथील एसबीआय बँकेतून साडे पाच लाख रुपये काढून घरी परतत होते. दरम्यान, नंदनवन येथील ट्रेंड्स शोरूमजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीच्या टायरला पंक्चर झाल्याची माहिती दिली.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावर गणवीर यांचा मुलगा कार थांबवून पंक्चर तपासण्यासाठी गेला, आणि त्याच वेळेत मागच्या दरवाजातून एका अज्ञात तरुणाने कारमध्ये प्रवेश करत रोख रक्कम असलेली थैली चोरून नेली. दुसरा तरुण दुचाकीवर तयारच होता आणि दोघे काही सेकंदांतच पसार झाले.

चोरी लक्षात येताच गणवीर यांनी तातडीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम पोलीस करत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरात नाकाबंदी केली असून, ही पूर्वनियोजित लूट असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

Advertisement
Advertisement